लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर :कोरोना बाधितांची नांवे जाहीर करण्यात यावी, त्यामुळे धोका कमी होईल अशी मागणी श्रीगोंद्याचे भाजपाचे आमदार, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
जी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत, त्या पॉझिटिव्ह व्यक्तीचे नाव, माहिती सध्या फक्त आरोग्य विभाग आणि महसूल विभागाकडे असते, परंतु या गोष्टीमुळे रुग्ण जर दवाखान्यात उपचार घेत नसेल आणि तो गृह विलगिकरणात आहे असे सदर रुग्णाने सांगितले तरी सदर रुग्ण परिसरामध्ये बिनधास्तपणे मोकळ्या स्वरूपात सर्वत्र 'सुपर स्प्रेडर'प्रमाणे फिरत आहेत. ही अत्यंत धोकादायक आहे.
तरी या गोष्टीला तातडीने आळा घालणे आवश्यक असून कोरोनाबाधितांची यादी किमान स्थानिक स्तरावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ज्यामुळे संबंधित रुग्ण जर रुग्णालयात उपचार घेत नसेल तर अशा रुग्णास क्वारंटाईन आहे की नाही? किंवा गृह विलगीकरणात आहे का? याची माहिती मिळणे सोपे जाईल आणि यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर जरब बसून कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकेल. यासंदर्भातील मागणीचे पत्र पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांना दिलं आहे, असे श्री. पाचपुते यांनी सांगितले.
0 टिप्पण्या