जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आदेश
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. हे लक्षात घेता नगर जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी केवळ जिल्ह्यातच आणि तोही मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयांनाच पुरवठा करावा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
ऑक्सिजनचा
तुडवडा लक्षात घेता नगर जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी केवळ
जिल्ह्यातच आणि तोही मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयांनाच पुरवठा करावा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. नगर जिल्ह्यात
अशा पाच कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्यांकडून मराठवाड्यातही आणि औद्योगिक
वापरासाठीही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. आता त्यांना केवळ नगर जिल्ह्यातच
पुरवठा करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
मंगळवारी
नगरमधील अनेक खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपला. त्यांना जिल्हा रुग्णालयातून
गरजेपुरता तात्पुरता पुरवठा करण्यात आला. मात्र, हा
पुरवठा सुरळित व्हावा यासाठी पुन्हा एकदा स्वयंसेवी संस्थांच्या महासंघातर्फे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नगरसाठी तातडीने बाहेरून
ऑक्सिजन येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांकडून वितरणात
भेदभाव होत असल्याचा आरोप काही खासगी रुग्णायांकडून करण्यात येत होता. शिवाय
नगरच्या काही कंपन्यांतून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरवठा केला जातो.
त्यामुळे नगरला पाच कंपन्या असूनही तुटवडा निर्माण झाला आहे. या तक्रारी लक्षात
घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज आदेश काढून ऑक्सिजनसाठी जिल्हाबंदी लागू केली.
त्यानुसार आता नगरमधील पाचही कंपन्यांना नगर जिल्ह्यातच आणि तोही केवळ
मान्यताप्राप्त कोविड हॉस्पिटललाच ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणार आहे. औद्योगिक
क्षेत्राला ऑक्सिजन देण्यास यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. नगर एमआयडीसीमध्ये
तीन तर श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यात प्रत्येकी एक कंपनी आहे. त्यांना
जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला असून जिल्हाबाहेर ऑक्सिजन पाठवू नये आणि शंभर
टक्के ऑक्सिजन कोविड रुग्णालयांनाच देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.
0 टिप्पण्या