Ticker

6/Breaking/ticker-posts

अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती जिवंत?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

उल्हासनगर:-उल्हासनगरमधील निर्मला गुप्ता या महिलेच्या वडिलांचा गेल्यावर्षी करोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगत, वांद्रे येथील एका रुग्णालयाने कुटुंबीयांसमोरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. मात्र तीन दिवसांपूर्वी एका जिवंत व्यक्तीला मृत समजून बॉडी बॅगमध्ये टाकत असल्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती म्हणजे निर्मला यांचे वडील रामसरण गुप्ताच असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये कुटुंबीयांनी गुप्ता यांचा शोध घेण्यासाठी तक्रार अर्ज केला आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे, तसेच रामसरण गुप्ता जिवंत आहेत तर कुठे आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

चेंबूर येथे राहणाऱ्या रामसरण गुप्ता यांना जून २०२०मध्ये करोनाची लागण झाली होती. त्यांना वांद्रे येथील शासकीय रुग्णालयात २७ जूनला उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान रामसरण यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने कुटुंबीयांना सांगितले. त्या काळात संसर्गाचा धोका पाहता, रुग्णाचा चेहराही कुटुंबीयांना दाखवता येत नव्हता. त्यामुळे गुप्ता कुटुंबियांच्या उपस्थिती वांद्रे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मृत व्यक्तीची उंची आणि शरीर बांधा पाहता हे आपले वडील नसल्याचा दावा त्यावेळी त्यांच्या मुलीने करत, रुग्णाचा चेहरा पाहण्याची विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने ती नाकारली होती.

मात्र तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एका जिवंत ज्येष्ठ नागरिकाला मृत समजून बॉडी बॅगमध्ये टाकत असल्याचा प्रकार समोर आला होता. हा व्हिडिओ निर्मला यांनी पाहिला असता, व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती आपले वडील असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यामुळे आपले वडील जिवंत आहेत तर वर्षभरापूर्वी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती कोण असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. या प्रकरणी गुप्ता यांच्या कुटुंबाने वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत, बृहन्मुंबई महापालिका आणि शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. तसेच पोलिसात तक्रारअर्ज दिला आहे. तसेच तो व्हिडीओ कधीचा आहे आणि आपले वडील जिवंत आहेत तर कुठे आहेत, याची चौकशी करण्याची मागणी गुप्ता कुटुंबाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या