लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ.नगर : बँकेच्या पैसे काढण्याच्या फॉर्मवर बनावट सही
करून दुसऱ्याच्या बॅंक खात्यावरील पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर तोफखाना
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील डोंबिवली नागरी सहकारी
बॅंकेच्या लालटाकी शाखेत हा प्रकार उघडकीस आला.
बॅंकेच्या
व्यवस्थापकाच्या सर्तकतेमुळे तोतयागिरी करणाऱ्या अशोक शिवाजी गाढवे (रा. चांदूस, ता. खेड, जिल्हा
पुणे) या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या शाखेत अल्ताफ शेख
यांच्या खात्यावरून पैसे काढण्याच्या फॉर्म भरून (विड्रॉल) त्यावर बनावट सही करून 25 हजार रुपये रक्कम आरोपीने लिहिली. पैसे काढण्याचा फॉर्म बॅंक
कर्मचाऱ्यांकडे दिला असता पडताळणीत सही बनावट असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही
माहिती तात्काळ शाखाधिकारी बयाजी सुभाष चव्हाण (वय 51) यांना
दिली. त्यांनी तात्काळ तोफखाना पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक इडेकर यांनी तात्काळ धाव घेत आरोपीला
ताब्यात घेतले. बॅंकेचे व्यवस्थापक चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना
पोलिस ठाण्यात आरोपी गाढवे याच्याविरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार केल्याचा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या