Ticker

6/Breaking/ticker-posts

मोठी बातमी ! अहमदनगर जिल्ह्यात मोठे निर्बंध ?


 कोरोना संपला असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा उच्चांक गाठला ..!

लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय झाला आहे. ही कोरोनाची आकडेवारी तालुकानिहाय जर पाहिली तर खूप भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे जाणवेल. मध्यंतरी कोरोना संपला असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा उच्चांक गाठला आहे..!

याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे संकेत दिले आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या टॉप-१० मधले तब्बल ८ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. या जिल्ह्यांमधील गर्दी थांबवावीच लागणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंधांची घोषणा मुख्यमंत्री ठाकरेंकडून केली जाण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे,मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,अहमदनगर, या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे. यात अहमदनगरचा उल्लेख असल्याने जिल्ह्यातही कठोर निर्बंध लादले जातील असे चित्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या