Ticker

6/Breaking/ticker-posts

निंबळकचे माजी सरपंच विलासराव लामखडे यांचे निधन

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर :-तालुक्यातील निंबळक येथील माजी सरपंच व उद्योजक विलासराव लामखडे ( वय ६० ) यांचे सोमवारी (१२ एप्रिल)  हदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले.

  त्यांच्या पश्चात वडीलपत्नीएक मुलगाएक मुलगीएक भाऊएक बहिण असा परीवार आहे. जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांचे ते धाकटे बंधूअजय लामखडे याचे वडील तर  सरपंच प्रिंयका लामखडे यांचे ते सासरे होत. दिवंगत विलासराव लामखडे यांनी दहा वर्ष सरपंच पद भूषविले होते. 

 त्यांच्या कार्यकाळात मीटर पध्दतीने पाणी योजना यशस्वी पणे राबवित राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून लौकीक मिळवून दिला होता. गावाला स्वच्छते विषयी पुरस्कार ह मिळवून दिले. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या