Ticker

6/Breaking/ticker-posts

रेमेडिसिवीरची काळाबाजारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: डॉ. राजेंद्र शिंगणे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

बुलडाणा: जिल्ह्यात काही लोक रेमडेसिवीर इंजेक्शनचा  काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून खाजगी रुग्णालयात रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यावर खाली झालेल्या बाटलीवर त्या रुग्णांचे नाव टाकण्याच्या सूचना देण्यात याव्या व त्याचे वेळोवेळी ऑडिट करावे. जी रुग्णालयं या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करावी, असे सक्त आदेश औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी दिले.

कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, उपजिल्हाधिकारी अहिरे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

काही लोक रेमेडिसिवीरची काळाबाजारी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून खाजगी रुग्णालयात रुग्णांना रेमेडिसिवीर इंजेक्शन दिल्यावर खाली झालेल्या बॉटलवर त्या रुग्णांचे नाव टाकण्याच्या सूचना देण्यात याव्या व त्याचे वेळोवेळी ऑडिट करावे. जे रुग्णालय या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी देखील रेमेडिसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा सूचना पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी लसीकरणाचा, स्वॅब तपासणी अहवाल व लोकडाऊनचा देखील आढावा घेतला असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण फार गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे.

लॉकडाऊनची काटेकोरपणे पोलीस विभागाने अंमलबजावणी करावी.जिल्ह्याच्या सीमेवर कडक बंदोबस्त ठेवावा. विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व येणाऱ्यवर कारवाही करावी. लग्नांमध्ये नियमापेक्षा जास्त मंडळी असल्याचं त्यांच्यावर देखील कडक कारवाही करावी. असे सक्त आदेश पोलीस प्रशासनाला यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या