Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवानगड लमाणतांडयावरील माहिला व मुलाची पाण्यासाठी वणवण..

  टँकरने पाणी पुरवठा करण्याची  मागणी

  









लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क


खरवंडी कासार : भगवान गड तांडा येथिल ग्रामस्थाना  पाणी नसल्याने  भगवानगडतांडा सोडुन जाण्याची वेळ निर्माण झाली आहे भारजवाडी ग्रामपंचायत भगवानगड तांडा येथील महीला लहान मुलांची पिण्याच्या पाण्यासाठी जनाव  रांच्या पाण्यासाठी पायपीट सुरु झाली येथे  राज्याच्या काना कोपऱ्यात जाऊन कोळसा तसेच उस तोडणी चे काम करणारे ग्रामस्थ येथे राहतात तो आता  गावाकडे  परतले आहेत,  

भगवानगडाच्या जवळ उंचावर असलेल्या या तांडयावर पिण्याच्या तसेच इतर कुठल्याही पाण्याची सुविधा नाहीत त्यामुळे या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केल्या शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध्‍ा नाह या ठिकाणापासुन सुमारे चार किलामिटर असलेल्या  दैत्यनांदुर येथील शेतक-यांच्या विहीरीवरुन डोक्यावर पाणी आणावे लागत आहे यामध्ये लहान मुलांचा  देखील समावेश असल्याने डोक्यावर हंडा घेऊन येणारे ही मुले भर उन्हामध्ये चालताना दिसत आहेत 

ऐकीकडे कोरोना संसर्गाने थैमान घातलेले असुन  सर्व तांडा एकाच ठिकाणहुन पाणी हाताने काढुन आणत असल्याने कोरानाचा संसर्ग होण्याचे जास्त शक्यता आहे. दुरसरीकडे पिण्याचे नाही व हाताला काम नसल्याने ही कुटुंबे या नेहमीच्या या कसरतीला कंटाळुन प्रशासन व ग्रामपंचायतीकडुन या रहिवाशांना कायम कुठलिही सुविधा मिळात नसल्याने या ठिकाणाहुन स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे

[ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिल्यानंतर या ठिकाणी इतर उपलब्ध सुविधांची तपासुन प्रस्ताव प्राताधिकारी यांच्या कडे पाठविण्यात येईल  ( तहसिलदार-  शाम वाडकर)

[भगवानगड तांडयावरील रहिवाशी हे उसतोडणी व कोळसा ची कामे करुन परतत आहेत, सध्याची परिस्थीती पाहुन तात्काळ टॅकर सुरु करावेत व लोकांना पाणी उपलब्ध करुन दयावे - दादासाहेब खेडकर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन ऊसतोड मजुर कामगार आघाडी अहमदनगर दक्षिण ]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या