कर्मचार्यांना केल्या सूचना
तर नागरिकांना शासनाच्या नियमाचे पालन करण्याची विनंती.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
)
नगर :- महानगरपालिकेच्या
सावेडी येथील आरोग्य केंद्रास महापौर.बाबासाहेब वाकळे यांनी अचा नक भेट देवून
पाहणी केली असता त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी मनपाच्या
कर्मचा-यांना खडे बोल सुनावले. तसेच नागरिकांना देखील शिस्तीचे पालन करावे,
सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे रहावे. आपल्यामुळे दुस-यांना त्रास
होवू नये असे ते म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रूग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. 45
वर्षा वरील नागरिक देखील लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रावर गर्दी करित
आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा ,
वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक
अंतराचे पालन करावे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रूग्णांना आवश्यक असणारा
रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली. इजेक्शनच्या तुटवडयामुळे मुख्यमंत्री ना..उध्दवजी
ठाकरे, आरोग्यमंत्री ना..राजेशजी टोपे,पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांना इंजेक्शन पुरवठा तातडीने करणे बाबत
पत्र देण्यात आले. शासनाने देखील दखल घेवून रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा शहर व
जिल्हयासाठी केला आहे. मनपाच्या वतीने रूग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वतोपरी
प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील स्वत:ची व आपल्या परिवाराची दक्षता घ्यावी.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अत्यंत आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर
पडावे.
लसीकरण करण्यासाठी सुचनांचे पालन केल्यास सर्वांना
लस मिळणार. मनपाच्या तोफखाना, केडगांव, सावेडी,
मुकुंदनगर, नागापूर आरोग्य केंद्रावर लसीकरण
करण्यात येत आहे. या ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करू नये. शिस्तीचे पालन करून
लस घ्यावी अशी विनंती केली. कोरोना रूग्णांनी घाबरून
न जाता कोवीड सेंटर मध्ये दाखल होवून योग्य ते उपचार घ्यावेत असे त्यांनी
दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
0 टिप्पण्या