लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबईः'अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर
व त्यातही आवाज उठवणारी स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ही
मंडळी भ्याडच म्हणावी लागतील,' अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा
वाघ यांनी एक ट्वीट केलं आहे.
चित्रा वाघ यांच्या या ट्वीटचा रोख नेमका कोणाकडे आहे. याविषयी चर्चा सुरु झाली
आहे.
'अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील. सुडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणार नाही हे लक्षात ठेवा,' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
रुपाली चाकणकर काय
म्हणाल्या होत्या?
' आता नवीन वसुली मंत्री कोण होणार?''
असा प्रश्न अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांनी
टीका केली होती. चित्रा वाघ यांच्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी उत्तर देताना 'चित्राताईंचा स्वत:चा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आहे आणि
त्या नवीन वसुली मंत्री कोण हे विचारत आहेत,' असा टोला हाणला
होता.
0 टिप्पण्या