Ticker

6/Breaking/ticker-posts

औरंगाबाद शहराची बॉर्डर आजपासून सिल..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

औरंगाबाद :-करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन घोषित केला आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाच्या पालनासाठी शहरात येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या किंवा जाणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. योग्य कारण नसलेल्या वाहनधारकांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना उघडी ठेवण्यात येणार आहे. या वेळेतच नागरिकांना भाजीपाला, किराणा, दूध खरेदी करण्याचे नियम लावण्यात आलेले आहेत. सकाळी अकराच्या नंतर मात्र रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस व मनपाच्या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे. विविध चौकात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना थांबवून त्यांच्याकडे बाहेर निघण्याचे कारणही पोलिस विचारत आहेत. ही कारवाई शुक्रवारपासून अधिक कडक करण्यात येणार आहे. तसेच, विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

याशिवाय महापालिकेचे फिरते पथक विनाकारण फिरणाऱ्यांची करोना चाचणीदेखील करणार आहेत. सर्व १७ पोलिस ठाण्यांचा फोर्स आणि होमगार्ड असा तगडा पोलिस फाटा रस्त्यावर उतरणार आहे. तसेच अन्न व औषधी विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके देखील कारवाई करणार आहेत. त्यामुळे मुबलक मनुष्यबळ असून नागरिकांनी अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे. सोबत वैद्य कागदपत्रे बाळगा आणि करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिस आयुक्तांकडून करण्यात आले आहेत.

शहरात येणाऱ्या सहा मुख्य मार्गावर चेक पोस्ट लावण्यात येणार आहे. या ठिकाणी नाकाबंदी करून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या वाहनधारक किंवा संबंधीतांकडे विचारण्यात करण्यात येणार आहे. योग्य कारण नसल्यास संबंधित वाहनधारकांविरोधात कारवाई केली जाईल. शक्य असेल तर अशा वाहनांना परत त्यांच्या शहराकडे पाठविण्यात येणार असल्याचे संकेतही पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या