Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना महामारी : जिल्ह्य प्रशासन कुचकामी ; पालक मंत्र्यांनी राजिनामा द्यावा

मनसेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष  गणेश रांधवणे यांची मागणी








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कुचकामी ठरले असुन याची सर्वस्वी जबाबदारी घेत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष  गणेश रांधवणे यांनी केली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि ,अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली असून जिल्ह्यात रेमडीसिव्हरचा काळा बाजार राजरोसपणे सुरु आहे. सामान्य नागरिकांना रेमडीसिव्हर व बेड मिळत नाहीत , त्यामुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन  मिळत नसल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबियांचे मरण उघड्या डोळ्यांनी पहावे लागण्याची दूर्देवी वेळ ओढवली आहे .अनेक रूग्णांचे नातेवाईक बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन साठी दिवस रात्र जिवाच्या आकाताने मेडिकल हॉस्पिटलचे उंबरे झिजवत फिरत आहेत. या सर्व गोष्टींना प्रशासनाचा निष्काळजीपणा व चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. 

कोरोना वरील लशीबाबत हि जिल्ह्यात तिच  परिस्थिती असून लशीसाठी नागरिकांना हेलपाटे घालायची वेळ आली आहे. तसेच यासर्व  गोष्टीसाठी नागरिकांची  राजरोसपणे लुट सुरू आहे.   यासर्व गोष्टीचे नियोजन करण्यात जिल्हा प्रशासन व पालकमंत्री पूर्ण पणे अपयशी ठरले आहेत . वास्तविक पालकमंत्री यांनी याबाबत प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन करणं गरजेचं होतं मात्र यात त्यांनी लक्ष घातल्याचे दिसून येत नाही.नागरिकांना ऑक्सिजन बेड, रेमडीसिव्हर वेळेत उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरले असुन   याबाबत  जिल्ह्यात हाहा:कार माजलेला आहे .

शेवगांवसह इतरही तालुक्यातील प्रमुख ग्रामीण रूग्णालयात देखील कोविड सेंटर उभारून याठिकाणी बेडची व्यवस्था करावी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी सूचना देखील त्यांनी केलेली आहे.

नियोजनाअभावी दिवसेंदिवस रुग्ण संख्या वेगाने वाढते आहे परिणामी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी 'लोकनेता न्यूज' शी बोलतांना केली आहे . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या