लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).
मुंबई: राज्यातील कोविड स्थिती लक्षात घेवून ब्रेक दि चेन अंतर्गत लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवण्यात
आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी आज याबाबत आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार १५ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीसह आता लागू असलेले सर्व
निर्बंध कायम राहणार आहेत.
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान
घातले आहे. ही भीषण स्थिती लक्षात घेऊन १३ एप्रिल रोजी एक आदेश जारी करत कठोर
निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर गर्दी कमी होत नसल्याने २१ एप्रिल रोजी
सुधारित आदेश काढत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्यात
आले होते. त्यात लोकल रेल्वे सेवा, मट्रो आणि मोनो सेवा सामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. त्याचवेळी एका
शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावर बंधने
आणताना पुन्हा ई-पास पद्धती सुरू करण्यात आली आहे. सध्या किराणा सामानाच्या
दुकानांसाठीही सकाळी ७ ते ११ ही वेळ देण्यात आली आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी याबाबतही नियम कठोर करण्यात आले आहेत. हे सर्व नियम आणि निर्बंध
१ मे सकाळी सात वाजेपर्यंत लागू होते. त्यात आज एका आदेशाने वाढ करण्यात आली आहे.
नव्या आदेशानुसार हे सर्व निर्बंध आता १५ मे पर्यंत कायम राहणार आहेत.
राज्य मत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या
बैठकीत कोविड स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. यावेळी लॉकडाऊनमुळे काही अंशी
रुग्णवाढीला ब्रेक लागला असून आणखी किमान १५ दिवस निर्बंध वाढवावे, असे म्हणणे बहुतांश मंत्र्यांनी
मुख्यमंत्री उद्वव
ठाकरे यांच्यापुढे मांडले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही
लॉकडाऊन वाढवला जाणार आहे, असे स्पष्ट संकेत दिले होते.
त्यानुसार आज लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे १५ दिवस
कडक लॉकडाऊन करण्याचा विचार करा, असे आजच मुंबई
हायकोर्टानेही सरकारला सांगितले आहे.
0 टिप्पण्या