लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बीड :- जिल्ह्यात
मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली
आहे. मंगळवारी एका दिवसात रुग्णसंख्या सातशेपेक्षा जास्त होती. दिवसागणिक वाढणारे
हे आकडे चिंताजनक असून, याकडे
गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची
साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत.
लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकरात लसीकरण करून घ्यावे; ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पूर्ण
केली आहे, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत असे आवाहनही
मुंडे यांनी केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करोनाची आकडेवारी
वेगाने वाढत आहे. ही रुग्णासंख्या विचारात घेतली असता ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन सिलिंडर याची कमतरता भासणार नाही, यासाठी
आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जनतेने नियमांचे पालन
करून व आवश्यक काळजी घेऊन सहकार्य करणे व प्रशासनास पाठबळ देणे आवश्यक आहे,
असे मुंडे यांनी म्हटले आहे.
सर्वत्र आरोग्य दूत आपले प्राण पणाला लावून करोना परिस्थितीशी
लढा देत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, तसेच पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे,
असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी बीड
जिल्हावासीयांना केले आहे.
0 टिप्पण्या