Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक : नगरमध्ये एकाच हॉस्पिटलमधील सात रुग्णांचा मृत्यू

 अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे  आवाहन 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : येथील एका खासगी हॉस्पिटमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित

काही रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने तर इतर काही रुग्ण विविध आजारामुळे दगावले असून एकाच हॉस्पिटलमध्ये  एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडना घडली.

नगर जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यासाठी रोज 60 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी 20 तर मंगळवारी 50 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. मात्र, रुग्णांची संख्या रोजच वाढत असल्याने तो ऑक्सिजन अपुरा पडत आहे.उपलब्ध झालेला 50 टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालय व शहरातील मोठ्या खासगी हॉस्पिटलला पाठवला जातो. याबाबत समप्रमाणात व न्याय्य पद्धतीने वाटप होत नसल्याने अनेक हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने तेथील रुग्णांचा जीव ऑक्सिजन अभावी गुदमरला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याचे बोलले जाते.

नगरमधील सर्व खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळावा यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर कोणतेही नियोजन होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ऑक्सिजन सिलेंडर आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. तेही खासगी रिफीलर प्लान्टवर जातात. मात्र तिथेही मोठ्या रांगा लागल्याने दहा ते बारा तासांनी ऑक्सिजन मिळतो. 

दरम्यान हीच परिस्थिती एका खासगी हॉस्पिटलमधे उपचार घेणाऱ्या रुग्णांवर बेतली व त्यातच त्यांचे मृत्यू झाल्याची बातमी व्हायरल झाली .  वास्तविक गेले दोन दिवसांपासून बहुतेक खासगी हॉस्पिटलला पुरेसा गॅस पुरवठा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली . त्यामुळे हे सर्व ७ रुग्ण गॅसअभावि  मृत पावल्याचा इन्कार केला आहे . कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या