लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: बॉलिवूड क्वीन कंगना रणौत नेहमीच तिच्या ट्वीटमुळे
सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. मागच्या काही काळापासून कंगना बॉलिवूडमधील मूव्ही
माफिया आणि घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आहे. पण आता नुकत्याच
केलेल्या एका ट्वीटमध्ये कंगनानं अक्षय कुमारकडून तिला सीक्रेट कॉल आल्याचं म्हटलं
आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या कंगनाच्या 'थलायबी 'चा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक मोठ्या
स्टार्सनी गुपचूप कॉल करून कौतुक केल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. यासोबतच, ते सर्व मूव्ही माफियाच्या भीतीनं माझं बिनधास्त कौतुक करू शकत
नसल्याचंही कंगनानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कंगनानं एका युझरच्या ट्वीटला उत्तर देताना अनेक
गोष्टींचा गौप्यस्फोट केला. कंगनानं तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'बॉलिवूडमध्ये शत्रू एवढे आहेत की,
काही लोकांना मात्र बिनधास्तपणे कौतुक करणंही कठीण जात आहे. मला
अनेक सीक्रेट कॉल्स आणि मेसेज येतात. ज्यात अक्षय कुमारसारख्या मोठ्या
स्टार्सचासुद्धा समावेश आहे. ज्यांनी 'थलायवी'च्या ट्रेलरनंतर माझं खूप कौतुक केलं पण ते दीपिका आणि आलियाच्या
चित्रपटांप्रमाणे माझं बेधडकपणे कौतुक करू शकत नाही. कारण बॉलिवूडमध्ये मूव्ही
माफियाची प्रचंड दहशत आहे.'
कंगनानं हे ट्वीट तेव्हा केलं जेव्हा लेखक अनिरुद्ध
गुहा यांनी ट्विटरवरील एक पोस्ट, 'बॉलिवूडमध्ये स्वतःचं मत मांडणं तुम्हाला संकटात टाकू शकतं' यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यांनी लिहिलं, 'कंगना याला अपवाद आहे आणि ती या पीढीतली अशी एकमेव अभिनेत्री आहे.'
अनिरुद्ध यांच्या याच ट्वीटवर रिप्लाय करत कंगनानं हा खुलासा
केला आहे.
कंगना बॉलिवूडच्या त्या कलाकारांपैकी एका आहे जे
आपलं मत नेहमीच बेधडकपणे सर्वांसमोर मांडतात. अनेकदा यामुळे कंगना वादाच्या
भोवऱ्यातही सापडते. बॉलिवूडमधील घराणेशाहीवर तर ती सातत्यानं बोलताना दिसते.
यावरून तिनं करण जोहरवर अनेकदा निशाणा साधत टीका केली आहे. याशिवाय बॉलिवूडच्या
मूव्ही माफियाविरोधातही ती अनेकदा बोलताना दिसली आहे.
0 टिप्पण्या