Ticker

6/Breaking/ticker-posts

संपूर्ण राज्यात कडक विकेंड लॉकडाऊन जाहीर ! काय सुरु , काय राहणार बंद जाणून घ्या ..

 शनिवार, रविवार कडकडीत बंद ..



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढच होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने आज  मोठा निर्णय घेतलाय. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंत्री परिषदेची बैठक पार पडली . त्यात ठरल्या प्रमाणे  कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्य सरकारने तयार केलेले नवे निर्बंध उद्यापासून लागू होणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

📌राज्यात काय सुरु, काय बंद राहणार ?

▪️ उद्यापासून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार

▪️ मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार

▪️ सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाणार

राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.

▪️सर्व बांधकामे सुरु राहतील

▪️सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार

▪️भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील

▪️ शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. मात्र राज्यातील चित्रपटगृहे बंद राहणार

▪️ सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक

▪️ 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

राज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार काही गोष्टी सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार आणि रविवार कठोर निर्बंध असणार आहेत, तशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या