लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
चेन्नई : आयपीएलच्या
14 व्या पर्वातील चौथा
सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळविण्यात आला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब
किंग्ज यांच्यात अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला.
अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना शतकवीर विस्फोटक
बॅट्समन संजू सॅमसनला ज्याने शेवटच्या बॉलवर सिक्सर मारु दिला नाही आणि समोर
आपीएलमधील सर्वांत महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस असताना देखील जो डगमगला नाही तो
पंबाजचा 22 वर्षीय बोलर अर्शदीप सिंग विजयाचा शिल्पकार ठरला.
शेवटच्या सहा बॉलचा थरार….
शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाब संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज होती आणि क्रीजवर होते बोलर्सची यथेच्छ धुलाई केलेला संजू
सॅमसन आणि आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस…. अशा परिस्थितीत देखील अर्शदीप आपल्या ध्येयापासून जराही हटला नाही.
ने पहिलाच बॉल अतिशय उत्तम टाकला. दुसऱ्या आणि तिसऱ्याही बॉलवर त्याने फलंदाजाला
आक्रमक फटका मारण्याची संधी दिली नाही. चौथ्या बॉलवर संजू सॅमसनने उत्तुंग षटकार
खेचला. पाचवा बॉल सॅमसनने सीमारेषेबाहेर धाडायचा प्लॅन आखला परंतु सीमारेषेवर
असलेल्या फिल्डरने तो बॉल अडवला. यावेळी एक धाव सहज निघाली असती परंतु
आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या संजूने धाव न घेण्याचा निर्णय घेतला आणि शेवटच्या
चेंडूवर 5 धावा लागत असताना मी षटकार ठोकून मॅच जिंकवू शकतो,
या आत्मविश्वासाने त्याने सहावा चेंडू खेळला.
परंतु अर्शदीपने स्लोवर वन चेंडू टाकत संजूला चकवलं. संजूने जोराचा
फटका मारला आणि दीपक हुडाच्या हातात चेंडू जाऊन स्थिरावला. अशा रितीने अर्शदीपने
अप्रतिम बोलिंग करत पीचवर दोन दिग्गज उभे असताना पंजाबला जिंकू दिलं नाही.
सरतेशेवटी एका ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्यााठी 13 धावांची गरज असताना अर्शदीपने केवळ 08 धावा
दिल्या आणि पंजाबला थरारक विजय मिळवून दिला.
पंजाबचा राजस्थानवर अवघ्या 4 धावांनी विजय
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना मंगळवारी रात्री
यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात
आलेल्या थरारक सामन्यात पंजाबने राजस्थानवर अवघ्या 4 धावांनी
विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानसमोर 221 धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू
सॅमसनने झंझावती शतक झळकावत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. परंतु शेवटच्या
चेंडूवर संजूला षटकार ठोकता आला नाही, त्यामुळे हा सामना
राजस्थानने गमावला.
0 टिप्पण्या