लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : - रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी च्या पुढाकाराने बॉम्बे मशिनरी शेवगावचे संचालक मा श्री. सुधीर शेठ सबलोक यांनी ग्रामीण रुग्णालय शेवगावच्या कोविड सेंटरला साहित्य खरेदीसाठी 50,,000/- रुपयाची मदत शेवंगावचे वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर काटे यांच्याकडे सुपुर्द केली. या मदतीमधून कोविड सेंटर साठी कॉम्प्युटर,फ्रीज ,खुर्च्या , कपाट, इत्यादी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. मदत मिळून देणेसाठी रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन डॉ भागनाथ काटे यांनी विशेष पुढाकार घेतला.
याप्रसंगी मा. तहसीलदार अर्चना पागिरे मॅडम, बोधेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक परदेशी, रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी चे अध्यक्ष किसनराव माने, सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी, खजिनदार डॉ पुरुषोत्तम बिहाणी, प्रोजेक्ट चेअरमन तसेच रोटरीचे माजी अध्यक्ष रो.भागनाथ काटे, माजी सहप्रांतपाल रो डॉ संजय लढ्ढा, माजी अध्यक्ष डॉ. गणेश चेके तसेच रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रम करोनाचे सर्व शासकीय नियम पाळून घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी चे अध्यक्ष किसनराव माने यांनी केले, सुत्रसंचलन डॉ भागनाथ काटे तर आभार सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी यांनी मानले.
0 टिप्पण्या