Ticker

6/Breaking/ticker-posts

44MP सेल्फी कॅमेऱ्याचा Vivo V21 5G भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

 


*Vivo V21 5G भारतात लाँच

*स्मार्टफोन Vivo V20 चे अपग्रेडेड व्हेरियंट

*४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा



लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्लीः भारतीय मार्केटमध्ये स्मार्टफोन निर्माता कंनी विवोने V सीरीज अंतर्गत एक नवीन हँडसेट लाँच केला आहे. या फोनचे नाव Vivo V21 5G आहे. हा स्मार्टफोन Vivo V20 चे अपग्रेडेड व्हेरियंट आहे. Vivo  V21 5G च्या तुलनेत खूपच स्लिक आणि हँडी आहे. Vivo  V21 5G चे खास वैशिष्ट्ये म्हणजे देशातील सर्वात स्लिम फोन असल्याचे बोलले जात आहे. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. जाणून घ्या Vivo V21 5G ची किंमत आणि फीचर्स.

Vivo V21 5G चे फीचर्स
यात ६.४४ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचे पिक्सल रेजोल्यूशन 2404×1080 आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या फोनमध्ये MTK Dimensity 800U चिपसेट दिला आहे. यात ८ जीबी रॅम दिली आहे. १२८ जीबी स्टोरेज आणि २५६ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरियंट मध्ये आहे. हा फोन Funtouch OS 11.1 वर आधारित अँड्रॉइड 11 वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. दुसरा ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स तर तिसरा २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आहे. या फोनमध्ये ४के व्हिडिओ, ऑटोफोकस, अल्ट्रा वाइड नाइट मोड, आर्ट पोर्ट्रेट व्हिडिओ सह अन्य फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी ४४ मेगापिक्सलचा सेल्फी शूटर दिला आहे. ड्युअल स्क्रीन लाइट्ससोबत येतो. या कॅमेरात EIS सोबत OIS दिले आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000 एमएएच ची बॅटरी दिली आहे. जी 33W फास्ट चार्ज सपोर्ट सोबत येते. Vivo V21 5G  ला डस्क ब्लू, सनसेट डेजल आणि आर्कटिक व्हाइट कलर मध्ये खरेदी करू शकता. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला २९ हजार ९९० रुपयांत लाँच केले आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३२ हजार ९९० रुपये आहे. फोनची प्री बुकिंग्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइट्सवर आणि ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. या फोनचा पहिला सेल ६ मे रोजी होणार आहे. लाँच ऑफर्स अंतर्गत फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास २५०० रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक दिला जाणार आहे. एक्सचेंज केल्यास ३ हजार रुपयांचा ऑफ, नो कॉस्ट ईएमआय आणि डिस्काउटेड दिला जाणार आहे.


·        Vivo V21 5G

·        Vivo V21 5G 256GB 8GB RAM

·         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या