लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई
: राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. दररोज जवळपास 50
हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात
वीकेंड लॉकडाऊन आणि कडक
निर्बंध लागू केले आहेत. मात्र आता महाराष्ट्रात 28 दिवसाचा
लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदाराने लिहिलं आहे. माजी
खासदार आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
लिहिलं आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे निर्बंध आहेत, त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे. महिनाभर असंच सुरु राहिलं तर नियंत्रणाबाहेर जाईल आणि आरोग्य यंत्रणा फेल झाल्याचं दिसेल. परिणामी महाराष्ट्राची संपूर्ण देशात बदनामी होईल, असं हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटलं आहे.
हरिभाऊ राठोड यांचं पत्र जसंच्या तसं
मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री म.रा.
मंत्रालय मुंबई
विषय:-
२८ दिवसाचा लॉगडाऊन लावण्याबाबत…
महोदय,
राज्यात
वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी लॉक डाऊन, मिनी लॉकडाउन,
वेगवेगळी बंधने, लावली जात आहेत. सर्व
जिल्ह्यात एक सारखी परिस्थिती नाही ,ही संपूर्णतः गोंधळाची
स्थिती आहे. राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहे, आणि
दिवसागणिक हा आकडा वाढत चालला आहे. कदाचित एक महिन्यानंतर हे अनकंट्रोल
होईल.यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे फेल झालेली दिसेल.अशा परिस्थितीमध्ये,
राज्याची नाहक बदनामी होईल, आणि जनतेच्या
स्वाथासाठी सुद्धा हे हानिकारक राहील. माझी आपणास विनंती आहे, कुणाचीही तमा न बाळगता, कडक धोरण स्वीकारावे लागेन,
कोरोनाची साखळी तोडावी लागेन, तरच आपण
कोरोनावर विजय मिळवू शकतो. असा माझा ठाम विश्वास आहे.
२८
दिवसाचा लॉगडाऊन जाहीर करावा, हे जाहीर करतांना ५ दिवस आधी
तो जाहीर करावा, सर्व पोलीस यंत्रणा, आरोग्य
यंत्रणा, अत्यावश्यक सेवा यांना सतर्क ठेवावे. या काळामध्ये
चीट पाखरूही बाहेर दिसू नये, असे कडक धोरण अवलंबविण्यात
यावे.
लॉगडाऊन
ची घोषणा करतांना काही गटांना आर्थिक मदतीची घोषणा व्हावी, उदा. शेतमजूर, इमारत बांधकाम मजूर , ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर,घरेलू
कामगार आणि बारा बलुतेदार यांच्यासाठी प्रत्येक कमीत कमी ५ हजार रु.ची घोषणा
करावी.
धन्यवाद..
आपला
हरिभाऊ राठोड
माजी वि.प.स.
0 टिप्पण्या