लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या
आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बहुसंख्य कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना
वर्क फ्रॉम होमचे आदेश (घरुन काम करण्याचे आदेश) दिले आहेत. परंतु घरून काम करताना
आपल्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे एक
चांगला लॅपटॉपआणि
दुसरं म्हणजे फास्ट इंटरनेट कनेक्शन.
बहुतेक कर्मचारी
त्यांच्याकडे चांगला लॅपटॉप नसल्याने चिंतेत असतात, किंवा काही जणांकडे
लॅपटॉप नसल्याने चिंतेत असतात. अनेकदा लोक जुन्या किंवा खराब लॅपटॉपवरुन काम करत
असतात. कारण नवीन लॅपटॉप घेण्याइतपत त्यांचं बजेट नसतं. तुमचीदेखील अशीच अवस्था
असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण अशा अनेक ऑनलाईन डील्स उपलब्ध आहेत,
ज्यात ग्राहकांना अगदी कमी किंमतीत लॅपटॉप खरेदी करता येतात.
यामध्ये डेल, एचपी, लेनोव्हो, अॅसर यांसारख्या कंपन्यांच्या प्रोफेशनल लॅपटॉपचा समावेश आहे. चला तर मग
जाणून घ्या, चांगले आणि स्वस्त लॅपटॉप्स कुठे मिळतील. (सूचना
: यामध्ये तुम्हाला रिफर्बिश्ड (नुतनीकरण करण्यात आलेले) लॅपटॉप्स खरेदी करता
येतील.)
: या
लॅपटॉपची किंमत 2,30,000 रुपये इतकी आहे. या लॅपटॉपवर
कंपनीने 88 टक्के डिस्काऊंट दिला आहे. त्यामुळे हा लॅपटॉप
तुम्ही 28,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये 14
इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. (2nd Gen Core
i5/4GB/500GB/Windows 7/Integrated Graphics)
लॅपटॉपमधील
प्रोसेसरबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये 2.6 GHz Intel Core i5 सेकेंड
जनरेशन प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4GB DDR3 RAM आणि 500GB
हार्ड ड्राइव्ह देण्यात आली आहे. गेमिंगसाठी यामध्ये Intel
Integrated ग्राफिक्स देण्यात आले आहेत. यामध्ये व्हिंडो 7 ऑपरेंटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या लॅपटॉपचं वजन 2.5 किलो इतकं आहे. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.
Lenovo
Thinkpad L420 14.1-inch Laptop
या लॅपटॉपची किंमत 2,50,000 रुपये इतकी आहे. या लॅपटॉपवर 89 टक्के डिस्काऊंट
देण्यात आला आहे. त्यामुळे हा लॅपटॉप तुम्ही 27,979 रुपयांमध्ये
खरेदी करु शकता. याच्या स्पेसिफिकशनबद्दल बोलायचे झाल्यास या लॅपटॉपची स्क्रीन 14.1
इंचांची आहे. (2nd Core I5 2520M/4GB/320GB/Window 7 Pro 64
Bit/Integrated Graphics)
यामध्ये 2.5GHz Intel Core I5
2520M सेकेंड जनरेशन प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या स्टोरेजबद्दल
सांगायचे झाल्यास यामध्ये 4 GB DDR3 RAM आणि 320GB हार्ड ड्राइव्ह देण्यात आली आहे. यामध्ये Intel HD ग्राफिक्स
3000 देण्यात आले आहेत. तसेच यात व्हिंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे, जी 64
Bit वर काम करते. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.
HP
Chromebook 14a-na0003TU
या लॅपटॉपची किंमत 24,990 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप तुम्ही 5,011 रुपयांच्या
फ्लॅट डिस्काऊंटसह खरेदी करु शकता. सोबतच यावर तुम्हाला 6 महिन्यांची
वॉरंटीदेखील मिळेल. हा लॅपटॉप 14 इंचांच्या स्क्रीनससह सादर
करण्यात आला आहे. हा एक लाईटवेट प्लस टचस्क्रीन लॅपटॉप आहे.
या लॅपटॉपमध्ये इंटेल
N4020 प्रोसेसर आहे. तसेच यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी SSD स्टोरेज आहे. या लॅपटॉपची स्टोरेज स्पेस 256
जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा लॅपटॉप क्रोम ओएस वर चालतो. 940
रुपयांच्या ईएमआयसह तुम्ही
हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.
Avita
Essential NE14A2INC433-CR
या लॅपटॉपची किंमत 17,990 रुपये इतकी आहे. 1,990 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह तुम्ही हा लॅपटॉप 16,000 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यावर 6 महिन्यांची
वॉरंटीदेखील देण्यात आली आहे. हा लॅपटॉप 14 इंचांच्या
स्क्रीनसह येतो. त्यात इंटीग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
यामध्ये सेलेरॉन N4020 प्रोसेसर
देण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी एसएसडी स्टोरेज आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 वर
चालतो. 753 रुपयांच्या
ईएमआयसह तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.
Dell
Latitude E6420-i5-16 GB-500 GB
या लॅपटॉपची मूळ
किंमत 89,000
रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप 60,310 रुपयांच्या
फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही हा लॅपटॉप अवघ्या 28,699 रुपयामध्ये खरेदी करु शकता. यावर 6 महिन्यांची
वॉरंटीदेखील मिळेल. हा लॅपटॉप 14 इंचांची स्क्रीन आणि
इंटीग्रेटेड ग्राफिक्ससह येतो.
सोबतच यामध्ये 2 जनरेशन
कोर आय 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 16 जीबी रॅम आणि 500 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली
आहे. हा लॅपटॉप व्हिंडोज 7 वर काम करतो. हा लॅपटॉप 1,351
रुपयांच्या EMI वर तुम्ही खरेदी करु शकता. ही
डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.
Iball
Compbook-OHD Atom
या लॅपटॉपची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप 2,009 रुपयांच्या फ्लॅट
डिस्काऊंटसह 10,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सोबतच यावर
6 महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. 11.6 इंचांच्या स्क्रीनसह येणाऱ्या या
लॅपटॉपमध्ये इंटेल इंटीग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
या लॅपटॉपमध्ये इंटेल
अॅटम प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी EMMC स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. हा लॅपटॉप
व्हिंडोज 7 वर चालतो. तसेच अवघ्या 376 रुपयांच्या
EMI वर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील Flipkart
च्या 2Gud प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
0 टिप्पण्या