Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमध्ये मृतदेहांचा खच, एकाचवेळी तब्बल 22 जणांना अग्नी, दिवसभरात 42 अत्यंसंस्कार

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: कोरोना विषाणू संसर्गाचं भयानक रुप आता समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर सामुहिक संसर्ग होतोय. दोनच दिवसांपूर्वी  बीड जिल्ह्यातील अम्बाजोगाईत एका सरणावर 8 जणांवर अंत्यंसस्कार केल्याचं समोर आलं होतं. तसाच प्रकार अहमदनगरमध्येही समोर आला आहे. अहमदनगरच्या अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. तर, दिवसभरात एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले

 

22 जणांचे सरणावर अंत्यसंस्कार  

अहमदनगर येथील अमरधाममध्ये असच ह्दयद्रावक चित्र समोर आलं असून अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभरात एकुण तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आलंय.

ह्दयद्रावक चित्र

अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावलीय.

अहमदनगरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनामुळे आत्तापर्यंत 1270 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने काल दिलेल्या आकडेवारीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे संख्येचा ताळमेळ बसत नाही. अहमदनगर जिल्हयात सध्या 11 हजार 237 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या