Ticker

6/Breaking/ticker-posts

ओला, उबरसह इतर कंपन्यांना RTO चा दणका

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांकडून ओला, उबर, झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या कंपन्यांच्या गाड्यांनी तब्बल साडेतीन कोटींचा दंड थकवला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी थकीत ई -चलान वसुलीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या, तसेच वाहतूक सुविधा देणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. वाहतूक पोलिसांकडून थकीत चलानबाबत कंपन्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यात सिग्नल मोडणे, नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग, वाहन चालवताना फोनवर बोलणे यासारख्या इतर कारणांचा समावेश आहे.

ओला, उबर, झोमॅटो आणि स्विगी या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सर्रास वाहतूक नियमांचं उल्लंघन केले जाते. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डिलीव्हरी ॲप कंपन्यांकडे साडेतीन कोटींचा दंड थकीत आहे. जवळपास गेल्या दीड वर्षापासून आतापर्यंत यातील एक रुपयाही भरण्यात आलेला नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर भरावा अशी सूचना वाहतूक पोलिसांनी संबंधित कंपन्यांना केली आहे.

लवकरात लवकर दंड भरण्याचे आदेश

मुंबई वाहतूक पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसरा, संबंधित सर्व कंपन्यांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेला दंड हा लवकरात लवकर भरून द्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे ओला आणि उबेर या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून जास्त प्रमाणाता नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी आकारलेल्या दंड थकवला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी संबंधित कंपन्यांना नोटीस दिली आहे, अशी माहिती प्रवीण पडवळ यांनी दिली आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या