Ticker

6/Breaking/ticker-posts

Oppo चा नवा Fitness Band ८ मार्चला भारतात होणार लाँच..! पहा काय खास..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्लीः ओप्पोने भारतातील ग्राहकांसाठी नवीन फिटनेस बँड लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनी या लेटेस्ट फिटनेस बँडला जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी लाँच करणार आहे. ओप्पोच्या माहितीनुसार, जरनल फिटनेस ट्रँकिंग शिवाय यात वियरेबल रियल टाइम हार्ट रेट, कंटीन्यूअस ऑक्सिजन सेचुरेशन मॉनिटरिंग आणि स्लीप दरम्यान ब्रिदिंग क्वॉलिटी असेसमेंट सारखे फीचर्स दिले आहेत. यात १२ वर्कआउट मोड्स सुद्धा ऑफर करणार आहेत.

 Oppo F19 Pro  बँड लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. सीरीज  या सीरीज अंतर्गत Oppo F19 Pro आणि Oppo F19 Pro+ 5G ला बाजारात उतरवले जाणार आहे. प्रो प्लस मॉडल ५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत तर प्रो मॉडल ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. ओप्पो इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडल अकाउंटवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. फीटनेस बँड ८ मार्च पासून ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर Oppo Band Style साठी वेगळे एक मायक्रोसाइट बनवली आहे. या फिटनेस बँडला ८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता लाँच करण्यात येणार आहे. कंपनीच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेलवर जाऊन हा इव्हेंट पाहू शकता.

ओप्पो बँड स्टायलमध्ये १.१ इंच कलर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. बँडचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ऑक्सीजन सेचुरेशन किंवा SpO2 लेवलवर लक्ष ठेवण्यात सक्षम आहे. याशिवाय, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लीप ट्रॅकिंग सपोर्ट सुद्धा या बँडमध्ये मिळणार आहे. स्लीप मॉनिटरिंग शिवाय Oppo Band Style मध्ये 12 बिल्ट-इन वर्कआउट मोड्स सारखे रनिंग, वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, योगा आदीचा या फीचर्स मध्ये समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या