Ticker

6/Breaking/ticker-posts

One Plus 9 आणि One Plus 9 Pro भारतात लाँच..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः OnePlus 9  हँडसेट निर्माता कंपनी वनप्लसने भारतात ग्राहकांसाठी आपली लेटेस्ट   One Plus 9 Seriesलाँच केले आहे. या लेटेस्ट सीरीज अंतर्गत वनप्लस ९, वनप्लस ९ प्रो आणि वनप्लस ९ आर हे तीन फोन बाजारात उतरवले आहेत. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो स्मार्टफोन सोबत ग्राहकांसाठी जबरदस्त कॅमेरा एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनीने Hasselblad सोबत हात मिळवला आहे.

OnePlus 9 चे फीचर्स
फोन अँड्रॉयड  ११ वर आधारित ऑक्सीजन ओएस ११ वर काम करतो. वनप्लस ९ मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080x2,400 पिक्सल) फ्लूइड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज दिला आहे. वनप्लस ९ मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींग साठी कंपनीने स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्यटे १२ जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवणे शक्य नाही. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिले आहे. वनप्लस ९ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत ५० मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसरआणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh ची बॅटरी दिली आहे.

One Plus 9 Pro चे फीचर्स
या  फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ ५ जीबी प्रोसेसर दिले आहे. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत LPDDR5 रॅम दिले आहे. २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. 48 MP Sony IMX789  प्रायमरी कॅमेरा सेंसर, सोबत 50 MP Sony IMX766 सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला आहे. जो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेंस सोबत येतो. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ग्राहकांना Hasselblad Pro Mode मिळणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ टी वार्प चार्ज आणि वार्प चार्ज ५० वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

फोनची किंमत
कंपनीने आपल्या वनप्लस ९ या लेटेस्ट स्मार्टफोनला तीन कलर व्हेरियंट मध्ये उतरवले आहे. Winter Mist, Astral Black आणि Arctic Sky या कलरमध्ये उतरवले आहे. वनप्लस 9 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरियंट १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लस ९ प्रो स्मार्टफोनला तीन कलर Morning Mist, Pine Gren आणि Stellar Black मध्ये लाँच केले आहे. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फओनची किंमत ६४ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज फोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या