MPSC
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई - राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएस्सी घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता २१ मार्च रोजी होणार आहे.
परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप उसळला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वाना संयम राखण्याचे आवाहन केले होते. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार येत्या २१ मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला होणार आहे. तर ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. असे वेळापत्रकात नमूद केलेले आहे.
0 टिप्पण्या