लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्टॅग बंधनकारक केला आहे. मात्र काही ठिकाणी बनावट फास्टॅगची विक्री
सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या फास्टॅगची ऑनलाईन
विक्री केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनावश्यक भुर्दंड लागण्याची शक्यता
आहे.
NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, फास्टॅग
सक्तीच्या पार्श्वभूमीवर बनावट फास्टॅगही बाजारात आणण्यात आले आहेत. विशेष म्हणजे
हे FAST ag जरी
बनावट असले तरी ते हुबेहुब दिसतात. त्यामुळे वाहनाधारकांनी सावधानता बाळगावी,
असे आवाहन NHAI ने केले आहे.
FAST ag खरा की खोटा, असे ओळखा?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर बनावट
फास्टॅगबाबत इशारा देण्यात आला आहे. वैध ऑनलाइन फास्टॅग घेण्यासाठी www.ihmcl.co.in
या संकेतस्थळावर किंवा MyFAStag app येथे
संपर्क साधावा. यासोबत अधिकृत बँका, बँकेच्या संकेतस्थळावरून
किंवा अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावेत. याची यादी ihmcl च्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी प्राधिकरणाचा
हेल्पलाइन क्रमांक 1033 यावर संपर्क साधावा किंवा etc.nodal@ihmcl.com
येथे संपर्क साधा, अशी सूचना प्राधिकरणाने
अधिकृत संकेतस्थळावर केली आहे.
बनावट फास्टॅगमुळे स्कॅन न होणे, पैसे वजा न होणे
असे प्रकार घडतात. फास्टॅगच्या रांगेत असल्याने वाहनचालकांना डबल टोल भरावा लागतो.
फास्टॅगसाठी आधीच पैसे मोजलेले असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक
भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे टोलनाक्यावर वादाचे प्रसंगही पाहायला मिळतात.
…तर भरावा
लागेल दुप्पट टॅक्स
जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये
प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न
केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा
लागेल.
कसा
खरेदी कराल फास्ट टॅग?
फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग
खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता
आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक,
अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट
आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम,
अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट
टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर
डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.
फास्ट टॅगची किंमत किती?
फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते
आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू
फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग
तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.
0 टिप्पण्या