लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अ .नगर :ज्या ज्या जिल्ह्यात पदाधिकारी निवडीबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. त्यात लक्ष घालून चुकीच्या व्यक्तींची नियुक्ती केलेल्या पदाधिकार्यांच्या पाठिशी कोणीही नेता असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पाटोले यांनी पदाधिकार्यांच्या नियुक्त्यांबाबत तक्रारी घेऊन आलेल्या शिष्टमंडळांना दिले.
प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांच्या उपस्थितीत पक्षाच्या गांधी भवन (कुलाबा मुंबई) येथे सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत नाना पटोले बोलत होते. बैठकीनंतर नगरचे बाळासाहेब भुजबळ यांचे शिष्टमंडळ नाना पटोले यांना भेटले, त्यावेळी याही प्रकरणात लक्ष घालू, असे आश्वासन आ. पटोले यांनी दिले.
अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी नवीन नियुक्ती करतांना ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना कोणतीही पूर्वसूचनान देता नगर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांत फूटटाकण्याच्या हेतूने ब्लॉक कमिटीला वेळोवेळी डावलूनही त्यांच्यात फूट पडत नाही म्हटल्यावरब्लॉक कमिटी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांच्या जागी नवीन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्याची कृती शहरातील पक्ष संघटनेत फूट टाकण्याचा प्रयत्न करणारे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली. या विरोधात श्री.भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे. नगरच्या पक्षस्थितीची कल्पनात दिली.
प्रदेशचे सरचिटणीस संजय लाखे पा., देवानंद पवार, मोहन जोशी यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करुन परिस्थिती समजावून घेतली. या शिष्टमंडळात पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, पक्षाचे प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, शहर उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी, सरचिटणीस अज्जूभाई शेख, राजेश सटाणकर आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या