लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
ढाका: बांगलादेशातील हिफाजत-ए-इस्लाम या कट्टरतावादी गटाच्या हजारो समर्थकांनी
हिंदूंच्या गावात हल्ला केला आणि सुमारे ८० घरे उद्ध्वस्त केली. बंगबंधू शेख
मुजीबूर रहमान यांचा पुतळा बसविण्यास विरोध दर्शवणाऱ्या कट्टरपंथी गटाचे सहसचिव
मौलाना मुफ्ती मामूनूल यांच्या भाषणावर एका युवकाने टीका केली होती.
फेसबुकवर मौलाना मामूनुल यांनी या तरूणावर
टीका केल्यावर हजारो कट्टरतावादी धर्मांध मुस्लिमांनी बुधवारी शल्ला उपजिल्ह्यातील
नौगाव या हिंदू गावात हल्ला केला. हल्लेखोरांची जमाव सशस्त्र होता. इतकेच नव्हे तर
या भागातील कट्टरतावादी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी रात्रीपासूनच निदर्शने करीत
होते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप
करण्यात येत होता.
७० ते ८०
घरांची तोडफोड
पोलिसांनी परिस्थितीला नियंत्रणात
आणण्यासाठी या युवकाला यापूर्वीच अटक केली. दरम्यान, काशीपूर, नाचनी, चांदीपूर व अन्य मुस्लिम बहुल गावातून हजारो लोकांनी सकाळी ९ वाजण्याच्या
सुमारास नौगाव येथे दाखल झाले आणि हिंदूंच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात ७० ते
८० घरांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हबीबपूरमधील विवेकानंद मजुमदार बाकुल
यांनी सांगितले की, गावात
अनेक घरांवर हल्ला झाला. हल्ला होण्याच्या भीतीने अनेक हिंदूनी सुरक्षितेच्या
कारणास्तव घर सोडले होते. या संधीचा फायदा घेत धर्मांधांनी घरांवर हल्ला केला आणि
काही घरांची लूट केली. लुटमार आणि हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या
संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या