लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : जळगाव आणि सांगली महापालिकेमध्ये महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या दे धक्क्यानंतर आता माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच जिल्हयात मोठा धक्का बसणार आहे. विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. हराळ यांच्या पक्षप्रवेशासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार निलेश लंके यांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान,बाळासाहेब हराळ यांच्या पक्षप्रवेशामुळे नगर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे.
त्यासाठी हराळ यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकही झाली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. हराळ यांचा पक्षप्रवेश निश्चित असून यांच्या पत्नी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य आहे. दरम्यान, बाळासाहेब हराळ यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे मी या आधीच सांगितले होते. हराळ यांच्या प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रस्थ वाढणार असल्याचा दावाही राज्यमंत्री तनपुरे यांनी केला.
0 टिप्पण्या