Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीराम मंदिराचा पाया उत्खनन करताना सापडल्या मूर्ती व पादुका

 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अयोध्या : -श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी पायाचे उत्खनन करताना सीता माता रसोई मंदिर ठिकाणी चरण पादुका चौकट व खंडित देवमूर्तींचे अवशेष सापडले आहेत .

जन्मभूमी परिसराचे सपाटीकरण करण्याचे काम सुरु आहे त्यात अनेक स्तंभ शिवलिंग असे प्राचीन अवशेष या आधीच सापडले असून ते ट्रस्टने सुरक्षित ठेवले आहेत राममंदिर परिसरात चाळीस फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे ट्रस्टचे कार्यालय प्रमुख प्रकाश गुप्ता यांनी सांगितले कि सपाटीकरण करताना काही मंदिरे व इमारतींना पाडण्यात आले होते सापडलेले अवशेष याच मंदिरातील असू शकतात असे म्हटले आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या