लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नेवासा:-
कुकाणा ग्रामपंचायतीच्या
ग्रामसेवकाला शिवीगाळ दमदाटी करून गाचंडी धरून चप्पलने मारहाण करून जखमी करून
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरुन
एका महिले विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असून महिलेला अटक करण्यात आली आहे.तसेच या महिलेने ही ग्रामसेवका विरुद्ध
तक्रार दाखल केली आहे. दोघांचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत.
याबाबत लोकसेवक फिर्यादी रमेश खंडेराव गायके(वय 53 वर्षे), ग्रामसेवक कुकाणा यांनी दिलेल्या फिर्यादीत
म्हंटले आहे की,मी शुक्रवार दि. 19 मार्च
2021 रोजी त्याचे कुकाणा ग्रामपंचायत कार्यलयात जात असताना
आरोपी महिला हिने फिर्यादिस शिवीगाळ दमदाटी करून
गाचंडी धरून चप्पलने मारहाण करून जखमी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
या फिर्यादी वरून सदर महिले विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला भादवी 353,332,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आला. तसेच यातील आरोपी महिलेने दिलेल्या
फिर्यादी वरून या ग्रामसेवक रमेश
गायके विरोधात भादवी कलम 509
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची
माहिती पोलीसांनी दिली.
0 टिप्पण्या