लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी मुंबई :- तळोजा येथील पिसार्वे
गाव परिसरामध्ये हेरॉईन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना
गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने व अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी संध्याकाळी
सापळा लावून अटक केली आहे. जसविंदर दलजित सिंग (२८) व साबिर रझाक पठाण (२३) अशी या
दोघांची नावे असून गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांजवळ असलेले १०३ ग्रॅम वजनाचे १०
लाख ३० हजार रुपये किमतीचे हेरॉईन तसेच, त्यांनी या
गुन्ह्यात वापरलेली स्कुटी व पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे.
अधिकाऱ्यांनी या दोघांची झडती घेतली असता जसविंदरजवळ
६ लाख २० हजार रुपये किमतीचे ६२ ग्रॅम हेरॉईन तर साबिर पठाणजवळ ४ लाख १० हजार
रुपये किमतीचे ४१ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. हे पदार्थ कुठून आणले याबाबत या
दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या पथकाने
दोघांविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना
अटक केली. याबाबत पुढील तपास सुरू आहे
0 टिप्पण्या