लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : देशभरात सध्या कोरोना लसीकरणाच्या
मोहिमेला सुरुवात झालेली आहे. लसीकरणाचा दुसऱ्या
टप्प्यालादेखील 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे. दरम्यान
लसीकरणासंदर्भात रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.
रिलायन्स कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या वॅक्सीनेशनचा
सर्व खर्च स्वत: करणार आहे.
नीता अंबानी म्हणाल्या, कोरोनावर लवकरच आपण
सर्वजण मात करूच परंतु तोपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. हे लढाई आता शेवटच्या
टप्प्यात आहे. मी आणि मुकेश अंबानी यांनी निर्णय घेतला की, आम्ही
रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना विनामूल्य वॅक्सीन
देणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना वॅक्सीन घ्यायचे आहे. त्यांनी सरकारी पोर्टलवर
नोंदणी करावी. जेणेकरून आपण कोरोनावर लवकरात लवकर मात करू शकेल, असे आवाहन देखील नीता अंबानी यांनी
कर्मचाऱ्यांना केले आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून
सुरू झाला आहे.
0 टिप्पण्या