Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगर रिंगरोड : लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची मंजुरी ..

 खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळाले  यश



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमदनगर:- शहरातील प्रस्तावित बाह्यवळण (रिंग रोड) रस्त्याच्या कामामध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. शहराचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता अहमदनगर शहरातून विविध राज्यांना जोड्णारे  महामार्ग आहेत, या महामार्गावर अवजड वाहतुकीमुळे नेहमीच रस्ता कोंडी, अपघात आणि रस्त्यांची दुर्दशा होते. गेल्या अनेक वर्षापासून नगरकर या समस्यांचा सामना करत आहेत . 

 

खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले, अहमदनगर शहराच्या वाहतूक समस्येच्या दृष्टीने प्रस्तावित अहमदनगर बाह्यवळण रिंग रोड होणे अत्यंत गरजेचे असून रिंगरोड झाल्यानंतर विळद घाट , निंबळक, नेप्ती, केडगांव, आरणगाव ते वाळुंज पर्यंत हा रस्ता प्रस्तावित असून यामुळे शहरातील अवजड वाहतूकीपासून नागरिकांना दिलासा मिळेल . अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे सर्वप्रथम या वाहतूक कोंडी बाबत आपण प्राधान्याने लक्ष घातले होते.  हा रिंग रोड अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे .  

 

2018 मध्ये  तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय रस्ते मंत्री नितीनजी गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली होती. नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया गेल्या दोन वर्षांपासून या परवानगीच्या प्रतीक्षेत होते . खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी व केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंग यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे या रिंगरोड साठी महत्वाच्या असणाऱ्या संरक्षण खात्याच्या लष्करी हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी वर्किंग परमिशन मिळाली आहे. त्यामुळे लवकरच काम पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या