लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी :-पाथर्डी
तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील अठरा ते वीस गावात अवकाळी पाऊस ,वादळी वारा
आणि गारपिटीने शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे
राहत्या घरांची पडझडीसह जनावरांचे गोठ्याचे व घरांचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून
गेली आहेत. त्यामुळे याभागाचा पाहणी दौरा आज आमदार
मोनिकाताई राजळे यांनी प्रांताधिकारी
देवदत्त केकाण ,तहसीलदार शाम वाडकर,कृषी
अधिकारी प्रवीण भोर यांच्या समवेत पाहणी दौरा करून नुकसानी बाबत प्रशासनाला सूचना
केल्या.
दौऱ्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड,सदस्य विष्णुपंत अकोलकर,जमीर आतार,राजेंद्र दराडे, बंडु नागरे, उद्धव घनवट, अबुभाई पटेल,आप्पासाहेब सातपुते, साहेबराव सातपुते, नितीन सातपुते उपस्थीत होते.
आमदार मोनिका राजळे यांनी आज सकाळी नुकसानग्रस्त भागाचा डांगेवाडी पासून पाहणी
दौरा सुरु केला.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन शेती पिकांची
नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तालुक्यातील पंधरा ते विस गावातील शेकडो एकर क्षेत्रावरील पिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.चितळी, पाडळी, साकेगाव,काळेगाव, सुसरे, पागोरीपिंपळगाव, सोमठाणे, सांगवी, प्रभुपिपंरी,माळेगाव, निपाणी जळगाव, कोरडगाव, कळसपिंप्री, ढवळेवाडी या गावला भेट देवुन पाहणी केली.
साकेगाव येथे केळी पिक, टरबुज, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुसरे येथे चिचं व कांदा पिकांला जबर फटका बसला आहे. पागोरी पिपंळगावमधेही कांदा, गहु, हरभरा, लिबोंणी, संत्रा, मोसंबी व डाळींब पिकाचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या बागेत कै-याचा खच पडला आहे.मोहरही गळुन गेला आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपीटीमुळे हिरावला गेला आहे. पिकासाठी झालेल्या लाखो रुपयाचा खर्च वाया गेला आहे. शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. जोरदार वाऱ्यांच्या झोक्याने अनेक ठिकणाच्या घरांची पडझड होऊन पत्रे उडून गेली मात्र यात कोणाला इजा झाली नाही.
महीलेला तात्काळ मदत
काळेगाव येथील चंदा मोहन सातपुते या महीलेचे घर
वादळात पडल्याने तिचा संसार उघड्यावर आला. घडलेली परस्थीती सांगताना सातपुते यांना आश्रु अनावर झाले.आमदार राजळेही भावुक झाल्या. या कुटुंबाला
पाथर्डी येथील सुवर्णयुग मंडळाकडून राजळे यांच्या हस्ते रोख पाच हजारांची मदत
तात्काळ घराचे पत्रे घेण्यासाठी दिली .
0 टिप्पण्या