लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याची रवानगी नगरच्या एमआयडीसी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
दरम्यान् आज ( सोमवारी ) बोठेला पोलिस अधीक्षक कार्यालयातील उपअधीक्षक तथा या प्रकरणाचे तपासी अधिकारी अजित पाटील यांच्या दालनात आणल्यावर त्याची दिवसभर कसून चौकशी सुरू होती. मात्र या चौकशीत नेमके काय उघड झाले ? याचा मात्र अधिक उलगडा होऊ शकला नाही.
रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणी मुख्य सुत्रधार असणाऱ्या फरार बाळ बोठेच्या पोलिसांनी शनिवारी भल्या सकाळी हैद्राबाद येथून मोठया शिताफीने मुसक्या आवळल्या. या प्रवासादरम्यान् अनेक बहाणे करणाऱ्या बोठेला. रविवारी पोलिसांनी पारनेरच्या न्यायालयात हजर केले होते. त्याला २० मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रवासादरम्यान बोठेला अलिशान गाडीत आणल्याचे तसेच त्याची बडदास्त ठेवल्याचे आरोप पोलिस प्रशासनावर झाले होते. रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल यांनी याबाबत सखोल चौकशी न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला होता. या बाबतचा खुलासा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी कालच पत्रकार परिषदेत केला होता.
बोठे याला ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याला पारनेर येथे न ठेवता नगरच्या एमआयडीसी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सोमवारी त्याला तपासी अधिकाऱ्यांच्या दालनात आणल्यावर कसून चौकशी करण्यात आली. त्यामुळे रेखा जरे यांचा खून नेमका कशासाठी आणि का करण्यात आला ? याचे रहस्य उलगडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान,पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल, पेन ड्राईव्सह अन्य गोष्टींच्या तपासाच्या दृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र बोठे कडून पोलिसांना हवी ती माहिती सहजा -सहजी उपलब्ध होणार नाही , असा अंदाज वर्तविला जात आहे . वास्तविक बोठे याच्या तपासाच्या दृष्टीने आणखी पाच दिवस शिल्लक असले तरी त्याच्याकडून उलगडा करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या तपासातून काय बाहेर येणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . दरम्यान हेच एम आय डी सी पोलिस स्टेशन एकेकाळी बोठे साहेब आल्यनंतर दारा खिडक्यांसह थरकत होते . आज त्याच ठिकाणी बोठेना थिजण्याची पुर्देवी वेळ आल.. म्हणतात ना काळाचा महिमा अगाध असतो ... तो हाच का ? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही ..!
0 टिप्पण्या