लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
औरंगाबाद: लॉकडाऊन रद्द झाल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर जमलेल्या
कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री जल्लोष साजरा केला. कोव्हिड नियमांचे उल्लंघन
करून बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २५ ते ३०
कार्यकर्त्यांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिटीचौक पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक विजय पवार
यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, ३० मार्च रोजी रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान खासदार इम्तियाज जलील
यांच्या एन-१२ येथील घरासमोर सार्वजनिक रोडवर विनामास्क २५ व ३० गर्दी जमा
असल्याची माहिती मिळाली. लॉकडाऊन रद्द झाल्याच्या निर्णय जाहीर होताच, या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील 'आगे बढो हम
तुम्हारे साथ है', 'कौन आया कौन आया, शेर
आया शेर आया' अशा घोषणा देत खासदार जलील यांना खांद्यावर
उचलून जल्लोष साजरा केला. हा जल्लोष रात्री १०. ४५ ते मध्यरात्री १ च्या दरम्यान
साजरा करण्यात आला.
या आंदोलनाच्या प्रकरणी मास्क न लावणे, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे,
बेकायदेशीररित्या जमाव जमविणे या प्रकरणी खासदार इम्तियाज जलील
यांच्यासह माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष शारेख
नक्षबंदी, विकास एडके, अज्जु नाईकवाडे,
आरेफ हुसैनी, अब्दुल समीर अब्दुल साजेद
यांच्यासह २५ लोकांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
गोरगरीब
आर्शीवाद देण्यासाठी जमा झाले
सर्वात आधी मी मास्क लावला नव्हता. जी कारवाई
सर्वसामान्य जनतेसोबत करण्यात येत आहे. तीच कारवाई माझ्यासोबत करावी. माझ्या
घरासमोर झालेला जमाव हा मी बोलवला नव्हता. लॉकडाऊन रद्द झाल्याच्या निर्णयानंतर
गोरगरीब दररोज कमवणारे अनेक जण जमा झाले होते. ते आर्शीवाद देण्यासाठी जमा झाले
होते. जे लोक माझ्या नावाने आज ओरडत आहेत. त्यांनी शासनाच्या समोर गरिबांसाठी
लॉकडाऊनच्या विरोधात आवाज उठविला असता, तर ही परिस्थिती आली नसती, असंइम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या