लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : निर्मलनगर परिसर हा गेल्या 30 वर्षापासून वास्तव्यास असून आता हा भाग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागात मोठी लोकवस्ती निर्माण झाली आहे. पुर्वीच्या काळामध्ये एमएसईबीने विद्युत तारा व पोल बसविण्यात आल्या आहेत. आता मात्र नागरिकांची घरे वाढत आहे. अनेक नागरिकांच्या घरावरून विद्युत तारांचे जाळे गेले असल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून गच्चीवर जावे लागत आहे.
एमएसईबी विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत तारांचा झोल निर्माण झाला आहे. विद्युत तारा आणखी खाली आल्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
तरी विद्युत विभागाने निर्मल नगरसह उपनगरातील नागरिकांच्या घरांवरील विद्युत तारा हटवावे व यापासून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा. या विद्युत तारांची पाहणी करून ते हटविण्याची मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी विद्युत विभागाचे इंजिनिअर गर्जे यांच्याकडे केली.
0 टिप्पण्या