Ticker

6/Breaking/ticker-posts

पोलिस दलात मोठे फेरबदल; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

 

* राज्याच्या पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे.

* सिंग यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 

मुंबई:- राज्याच्या पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा राज्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी केली आहे  .

 पोलिस आयुक्त असलेले परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकू येत होती. परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या बरोबरच रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलिस पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची दबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झालेले हेमंत नगराळे हे सन १९८७ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांनी२०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदावर काम केले आहे. पुढे दोन वर्षांनी, सन २०१८ मध्ये त्यांची नागपूरला बदली करण्यात आली होती. मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होत असाना नगराळे पोलिस महासंचालक   (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून काम करत होते. हेमंत नगराळे यांचा १ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

सरकारचा मोठा निर्णय- नव्या बदल्या

हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त

रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार

संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी

परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जवाबदारी

पवारांचा परम बीर सिंहांना हटवण्याचा आग्रह

दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या