Ticker

6/Breaking/ticker-posts

शहराच्या विकासात निश्चित योगदान देऊ : सभापती अविनाश घुले

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: आ. संग्राम जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करत सभापती पदाची जवाबदारी दिली आहे. सर्व नागरिकांच्या सहकार्याने या पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासात निश्चित योगदान देणार आहे अशी ग्वाही  सभापती अविनाश घुले यांनी दिली.

वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानच्यावतीने मनपाचे नूतन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांन्चा  ईश्वर बोरा  व अध्यक्ष प्रतिक बोगावत यांनी सत्कार केला,यावेळी सत्काराला उत्तर देतांना घुले यांनी हा विश्वास व्यक्त केला.

 यावेळी ईश्वर बोरा म्हणाले की ,नगर शहराचा विकास महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. शहराचा चांगला विकास व्हावा यासाठी विकासात्मक दृष्टीकोन असलेले पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मनपा स्थायी समितीचे नूतन सभापती पदावर  अविनाश घुले हे अनुभवी व्यक्तीमत्व विराजमान झाले आहेत. ते शहराच्या विकासात नक्कीच मोलाची भर घालतील. वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानचे अविनाश घुले हे मार्गदर्शक आहेत. सभापतीपदी त्यांची झालेली निवड आम्हा सर्वांना अभिमानस्पद आहे, असे वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानचे ईश्वर बोरा यांनी केले.

यावेळी चिंटू खंडेलवाल, मनीष सोनग्रा, संदीप बायड, गणेश गोयल, आदित्य गांधी, संभव काथेड, संतोष ठाकूर, हेमंत रासने, संजय कांगला, प्यारेलाल खंडेलवाल, रवी किथानी, अजय ढोणे, भैय्या भांडेकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या