Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ बुमराहची विकेट जाणार..! ' अभिनेत्री अनुपमा बरोबरचा सिलसिला चर्चेत

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

 नवी दिल्लीः   क्रिकेट आणि  चित्रपट यांचे बन्ध कायमच चर्चेत येतात.   भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा जलदगति  गोलंदाज जसप्रीत बुमराह ने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली. त्याने बीसीसीआयला तशी विनंती केली होती. त्यानंतर बुमराहने घेतलेली सुट्टी ही लग्नासाठी असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आता बुमराह कोणासोबत लग्न करणार याची चर्चा सुरू झाली आहे.


सोशल मीडियावर या चर्चा सुरू असताना एका अभिनेत्रीने देखील सुट्टी घेतल्याने बुमराहच्या सुट्टीचा आणि या अभिनेत्रीच्या सुट्टीचा चाहते लिंक लावण्याचा प्रयत्न करत आहेत. बुमराहसह सुट्टी घेणारी अभिनेत्री म्हणजे दक्षिणेतील चित्रपटात काम करणारी अनुपमा परमेश्वन आहे.

बुमराहने वैयक्तीक कारण देत चौथ्या कसोटीतून माघार घेतली होती. तेव्हा अशी चर्चा सुरू झाली होती की त्याने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. पण एएनआय वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतली आहे. पण तो कोणाची लग्न करणार आहे याबद्दल काही सांगितले नाही. बुमराह चौथ्या कसोटीत नंतर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत देखील खेळणार नाही. त्याच बरोबर तो वनडे मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही असे कळते.

अभिनेत्री अनुपमाने मळ्याळम आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे. काही दिवासांपूर्वी बुमराह आणि अनुपमा यांच्या डेटिंगचे वृत्त समोर आले होते. बुमराहची सुट्टी आणि लग्न चर्चेत अनुपमाने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करताना तिने हॅपी हॉलिडे टू मी असे म्हटले आहे. सोबत हसणारी इमोजी टाकली आहे. आता या पोस्टवरून अनेकांनी या दोघांचे लग्न होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या