Ticker

6/Breaking/ticker-posts

श्री क्षेत्र देवगड : भगवान दत्तात्रयांचे मंदिर दर्शनासाठी पुन्हा बंद..!



 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

श्री क्षेत्र देवगड:- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पुन्हा एक वर्षानंतर शनिवार  पासून श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने भगवान दत्तात्रयांचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दूकाने बंद ठेवलेली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.

श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर हे रुग्ण संख्या कमी होत नाही तोपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतलेला आहे. दरम्यान मंदिरातील नित्यपूजा, आरती ही नियमित सुरु राहील. परंतु बाहेरगावाहून आलेल्या यात्रेकरू पर्यटक दर्शनार्थींसाठी मात्र मंदिर दर्शनासाठी खुले असणार नाही. भगवान दत्तात्रय मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर, श्रीसमर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा समाधी मंदिर ही देवालये बंद असतील. प्रवरापात्रात नौकाविहार तसेच परिसरात असणारी छोटी हॉटेल्स, प्रसादालय, दुकाने हेही बंद असतील,

घरून नामचिंतन करत दर्शन घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. दोन व्यक्ती मधील अंतर दोन मीटर ठेवावे. तोंडावर मास्क लावावा. वेळोवेळी हात धुवावे.  रुग्णसंख्या कमी झाल्या नंतर नेहमीप्रमाणे मंदिर परिसर हा पूर्ववत सुरू केला जाईल, असे आवाहन भास्करगिरी महाराजांनी जनतेस केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या