लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:- जागतिक महिला दिनानिमित महिलांसाठी येथील योग विद्या धाम या संस्थेमार्फत दि.8 मार्च पासून अहमदनगर शहरातील विविध भागात मोफत योग संजीवन हे वर्ग महिलांसाठी मोफत घेतले जाणार आहेत, अशी माहिती योग विद्या धाम चे अध्यक्ष डॉ.सुंदर गोरे यांनी दिली.
महिलांना घरातील कामे, मुलांच्या शाळा, त्यांचा अभ्यास, घराबाहेरची कामे यामुळे त्यांना इच्छा असूनही सकाळचा योग वर्ग करता येत नाही. त्यामुळे सहाजिकच आरोग्याकडे दूर्लक्ष होते. म्हणून योग विद्या धामच्यावतीने महिलांसाठी मोफत योग वर्गाचे आयोजन केले आहे. सध्या मान, पाठ, कंबर दुखीची समस्या घराघरात भेडसावत आहे. या त्रासातून कायमची मुक्तता देणारा व चांगल्या प्रकारचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणारे योग संजीवन हे वर्ग सुरु करण्यात येत आहे.
योग भवन - कुष्ठधाम रोडवरील, योग भवन- सिध्दीबाग, भुतकरवाडी - सुंदर भवन, गुलमोहर रोडवरील - नवले हॉल’, तपोवन रोडवरील -संत सेना भवन, बोल्हेगांव फाटा येथील- गणेश मंदिर, कल्याण रोडवरील विद्या कॉलनी येथील -छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन नगर येथे होणार आहेत.
तरी या संधीच्या जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन योग विद्या धामच्या कार्यवाह अंजली कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री.राजन कुमार भ्रमण ध्वनी 9422791710 किंवा भक्ती देवकर दूरध्वनी क्र. 2421255 यांचेशी संपंर्क साधावा.
0 टिप्पण्या