Ticker

6/Breaking/ticker-posts

देऊळगावसिध्दी तलावाने गाठला तळ; आता ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई..!

 


 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 वाळकी : नगर तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला . अनेक गावातील तलाव काठोकाठ भरले . मात्र पाऊस होऊनही देऊळगाव सिध्दी ( ता. नगर ) येथील तलाव यंदा पाण्याविना रिकामाच राहिला . दरवर्षीअर्धा अधिक भरणार तलाव यावर्षी पंचवीस टक्के ही भरला नाही . सध्या मार्च महिन्यातच तलावातील पाण्याने तळ गाठला आहे . तलावात फक्त खड्डयात पाणी असल्याने यंदा देऊळगावकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे .

 नगर तालुक्यात या वर्षी चांगल्या सरासरीने पर्जन्यवृष्टी झाली . अनेक गावांचे तलाव पुर्ण क्षमतेने भरले . वाळकीचा तलाव ओहरफ्लो झाला . मात्र वाळकीपासून पाच किमी . अतंरावर असणारा देऊळगाव सिध्दी येथील तलाव यंदा भरलाच नाही . तालुक्यात यंदा टँकरची मागणी कुठेही झाली नसली तरी , देऊळगावकरांना लवकर टँकरची मागणी करावी लागणार आहे . देऊळगाव येथील तलाव बांगरी नदीवर बांधलेला आहे . नदीचा उगम अगदी जवळच असलेल्या घोसपुरी डोंगर परिसरातून होतो . व चिखलीतील डोंगरातील काही प्रमाणात पाणी या नदीमार्गे तलावात येते . नदीच्या उगम परिसरात या वर्षी रिमझिम पाऊस झाल्याने तलावात पाण्याची आवक कमी झाली .परिमाणी यंदा तलाव अवघा पंचविस टक्केच भरला .

 येथील नागरिकांना दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी तलावात विहीर आहे . तलावात पाणी असे पर्यंतच विहीरीत पाणी असते . सध्या तलावातील पाण्याने तळ गाठला असल्याने विहीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे . आणखी महिनाभरात तलाव पूर्णपणे कोरडा पडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले . त्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे . दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत आहे . गावठाण मध्ये घोसपुरी योजनेचे पाणी मिळते . तर वाडी वस्तीवरील नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे . या वर्षी गावात पाणीटंचाई लवकरच निर्माण होणार असून नागरिकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा लवकरच सुरू करावा लागणार असल्याचे उपसरपंच नानासाहेब बोरकर यांनी सांगितले .

 पाण्याअभावी भूईमुगाचे आगार उद्धवस्त

देऊळगाव सिध्दी येथील तलाव मोठा आहे . तलाव भरल्यानंतर पाटचारीद्वारे शेतीला पाणी मिळत होते . त्यामुळे येथील शेतीत उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते . भूईमुगाचे क्षेत्र इतके मोठे होते की , पिक काढण्यासाठी परिसरातील वाळकी , हिवरे झरे , वडगाव आदी परिसरातील मजुर भुईमुग काढण्यासाठी व शेंगा तोडण्यासाठी येत होते . मात्र मागील काही वर्षापासून पावसाचे प्रमाण अल्प स्वरूपाचे असल्याने तलाव पूर्ण क्षमतेने कधी भरलाच नाही . उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना टँकरचा आधार घ्यावा लागला . त्यामुळे पाण्याअभावी येथील भुईमुगाचे आगारच उध्दवस्त झाले .

घोसपुरी पाण्याच्या दराबाबत दुजाभाव –(नानासाहेब बोरकर , उपसरपंच देऊळगाव सिध्दी)

देऊळगाव सिध्दीतील नागरिकांना टंचाई काळात घोसपुरी योजनेतून पाणी घ्यावे लागते . या योजनेतून येणाऱ्या पाण्याचा दर हजार लिटरसाठी १५ रूपये याप्रमाणे आहे . मात्र येथील पाण्यासाठी २० रुपये प्रमाणे दर आकारला जात आहे . घोसपुरीतून मीटरद्वारे पाणीपुरवठा आहे . पाईपलाइनला होणारी गळती आणि दरात होत असलेल्या दुजाभावामुळे थकबाकी वाढत आहे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या