Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर शहरात दहा ठिकाणी 'मायक्रो कंटेन्मेंट झोन'

 



लोकनेता
 न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अ.नगर :- कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेऊन आणखी प्रसार होऊ नये म्हणून महापालिकेने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगर शहरात दहा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत. ‘कोरोना-2’ची सुरूवात मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात कहर करण्यास सुरूवात केली असून, रूग्णांमध्ये प्रतिदिन मोठी वाढ होत आहे. नगर शहरासह जिल्ह्यात या वाढीचा सीलसिला सुरूच आहे. तसेच सरासरी दोन मृत्यू यामुळे होत असल्याने प्रशासन दक्ष झाले आहे. नगर शहरात रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जास्त रूग्ण असलेला परिसर सील करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी कंटेन्मेंट झोन निश्चित करताना त्याची व्याप्ती कमी केली आहे. तसेच झोनबाहेर पूर्वी असलेला बफर झोन रद्द करण्यात आला आहे. ठराविक घरातील लोकांनाच ये-जा करण्यास बंधने असल्याने  त्याचे नियमन करणेही यामुळे सोपे जात आहे.

नगर शहरात आतापर्यंत बोल्हेगाव परिसरात तीन ठिकाणी, तसेच आर्यन सोसायटी (बालिकाश्रम रस्ता), सिव्हील हडको, कोहिनूर मंगल कार्यालयासमोरी जयश्री कॉलनी, माणिकनगर, निलायम सोसायटी, सारसनगर-चिपाडे मळा आणि केडगाव या दहा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत. आर्यन सोसायटीमध्ये पाच विंग्ज आहेत. त्यातील बी आणि सी या दोन विंग्ज सील करण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी बंधने नाहीत. तसेच ज्या घरामध्ये रूग्ण आढळलेले आहेत, त्या घराच्या आसपास असलेले चाप-पाच घरांचा समावेश कंटेन्मेंट झोनमध्ये करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी बॅरिकेट, बांबू लावून त्यांच्याकडे जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच तेथे महापालिका कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

केअर सेंटरसाठी अजूनही तयारीच

नगर शहरात रूग्ण वाढू लागल्यानंतर महापालिकेमार्फत कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी वाढू लागली आहे. आठ दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नटराज आणि जैन पितळे होस्टेल या ठिकाणी पाहणीही केली होती. मात्र अद्याप ते सेंटर सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येते. याबाबत चौकशी केली असता कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून, कोणत्याही क्षणी सेंटर सुरू होतील, असे सांगण्यात येते. तयारी करण्यात आल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून सांगण्यात येते, मात्र प्रत्यक्ष सेंटर सुरू होण्यास मात्र अद्याप मुहूर्त मिळलेला नाही. 

कंटेन्मेंट झोन वाढण्याची शक्यता

जिल्ह्यात रूग्ण वाढ वाढत असली, तरी सर्वाधिक रूग्ण नगर शहरात वाढत आहेत. सोमवारी दि. 15  मार्च या एकाच दिवशी नगर शहरात 229 नवीन रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्हा आणी महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. रूग्ण वाढल्याने संबंधित परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या