लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई
: “मराठवाड्याच्या विकासाचा आणि त्या 12 आमदारांचा काय संबंध
? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे विधान दुर्दैवी
आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही”, असा
हल्लाबोल माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. त्या मुंबईत बोलत
होत्या.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.
पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. वैधानिक विकास महामंडळाच्या
नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या 12 आमदारांची नावं जाहीर
करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा
गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले,
12 आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं
ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, असा हल्ला चढवला. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनीही अजित पवारांवर
हल्लाबोल केला. अजित पवारांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. कुठल्या
राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही”, असं पंकजा मुंडे
म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
अजितदादा जे तुमच्या पोटात होतं ते ओठावर आलं. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे.
त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नाही. वैधानिक विकास महामंडळ हा आमचा
हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा
किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही
मिळवून घेऊच, असं फडणवीस यांनी सांगितलं.
0 टिप्पण्या