Ticker

6/Breaking/ticker-posts

जेऊर येथील महाराष्ट्र बँक बंद ; नागरिकांचा खोळंबा

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

जेऊर :  नगर तालुक्यातील जेऊर येथील महाराष्ट्र बँक शाखेचा कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आल्याने बँक बंद ठेवण्यात आली आहे. बँक बंद असल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा झालेला आहे.

 
जेऊर येथे बँक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेतील कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आल्याने बँक व्यवस्थापनाने बँकेचे संपूर्ण कामकाज बंद ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांना कर्जप्रकरणे नवी-जुनी करण्यास अडथळा निर्माण झालेला आहे.

 अनेक शेतकऱ्यांची खाते राष्ट्रीयकृत बँक म्हणून महाराष्ट्र बँकेतच आहेत. खेळते भांडवलाचे कर्जप्रकरणे हि नवे-जुने करण्यासाठी महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी जावेच लागते. मार्च अखेरीस सर्व कर्ज प्रकरणे भरण्यासाठी तसेच व्याज भरण्यासाठी पैशाची देवाणघेवाण करावी लागते. बँक बंद असल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. बँक बंद असल्याबाबतचा फलक बँकेच्या दरवाजावरच लावण्यात आला आहे.   बँक बंद असल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. बँकेने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या