लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार गावात
द्राक्ष घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात १ ठार तर चार
जण जखमी झाले आहेत.
द्राक्ष घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोचे ब्रेक झाल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्थानकाला धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर चार जण जखमी झाले. बसस्थानक आणि तेथे उभ्या अन्य वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली. बुधवारी रात्री गावात हा अपघात झाला.
श्रीगोंदा तालुक्यातून द्राक्ष घेऊन टेम्पो (एम एच १५ डीके ६३८९) नाशिककडे निघाला होता. पारनेर तालुक्यातून जात असताना कान्हूरपठार गावात टेम्पोचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्थानकात शिरला. तेथे काही लोक उभे होते, तर रस्त्यावर अन्य वाहने उभी होती. टेम्पोची धडक बसल्याने राहुल शिवराम पवार (वय १७ वडगाव दर्या) हा युवक जागीच ठार झाला. याशिवाय अतुल शिवराम घुले (वय ५० रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर), सतीश शिंदे (वय १४) गणेश आबा रोकडे (वय २० रा. वडगाव सावताळ), प्रकाश राजु पवार (वय ३८ रा. वासुंदे, ता. पारनेर) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी टेम्पो चालक अतुल प्रजापती याला अटक केली.
द्राक्ष घेऊन जाणारा हा टेम्पो वेगाने जात
असताना ब्रेक झाले. गावातील बसस्थानक परिसरातच ही घटना घडल्याने तेथे वर्दळ होती.
टेम्पोची धडक बसल्याने बस स्थानकाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय तेथे उभ्या
असलेल्या दुचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. पारनेरचे पोलीस निरीक्षक घन:श्याम
बळप आपले सहकारी अधिकारी विजयकुमार बोत्रे,
बालाजी पद्मने यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना
उपचारासाठी रुग्णालयात हलविले. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. रस्त्यावर
अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याकडे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचे लक्ष
वेधले. बसस्थानकाला न धडकता टेम्पो तशाच अवस्थेत पुढे गेला असता तर मोठा अनर्थ
घडला असता, असे सांगण्यात आले.
0 टिप्पण्या